पतीच्या न्यायासाठी महादेव मुंडेंच्या पत्नीचं बीडमध्ये आमरण उपोषण सुरु
03-Mar-2025
Total Views |
बीड : (Mahadev Munde Case) महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा तपास तात्काळ एसआयटी आणि सीआयडीकडे द्यावा, हत्येच्या कटात ज्यांनी फोन केलेत त्या आरोपींचे सीडीआर काढावे तसेच महादेव मुंडेंच्या आरोपींना तात्काळ अटक करावी या ३ प्रमुख मागण्यांसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीय बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत.
आरोपींचे आणि पोलिसांचे सीडीआर काढण्याची मागणी आम्ही करत असून पोलिस यंत्रणा आरोपींची पाठराखण का करत आहे? असा सवाल महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपस्थित केला आहे. आता जोपर्यंत आरोपींना अटक केली जाणार नाही तोपर्यंत उपोषण स्थळावरून उठणार नाही. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लवकरात लवकर एसआयटी स्थापन करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली.
परळीतील महादेव मुंडे यांची १६ महिन्यांपूर्वी परळी तहसील कार्यलयाच्या परिसरात खून झाली होती. १६ महिने उलटून गेलेत तरीही या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. आरोपीला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. याच अटकेच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे या परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसल्या आहेत.