महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान

    03-Mar-2025
Total Views |

elections announced for 5 vacant seats of maharashtra legislative council
 
मुंबई : (Maharashtra Legislative Council Elections 2025) राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २७ मार्च रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यामुळे, विधानपरिषदेच्या या ५ जागांवर कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानपरिषदेवर असलेल्या ५ आमदारांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामध्ये, शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर, भाजपचे आमदार प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
 
निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रक : 
 
⦁ निवडणुकीची अधिसूचना - १० मार्च
 
⦁ अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - १७ मार्च
 
⦁ अर्जाची छाननी - १८ मार्च
 
⦁ अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २० मार्च
 
⦁ मतदान - २७ मार्च (स. ९ ते दु. ४ वाजेपर्यंत)
 
⦁ मतमोजणी - २७ मार्च (सायंकाळी ५ वाजता)