सावंतवाडीत आढळला वाघाचा मृतदेह; 'या' कारणामुळे झाला मृत्यू

    03-Mar-2025
Total Views |
tiger found in sawantwadi




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात सोमवार दि. ३ मार्च रोजी पट्टेरी वाघिणीचा मृतदेह आढळून आला (tiger found in sawantwadi). दाभीळ गावातील नदीच्या खोल विवरामध्ये वाघिणीचा मृतदेह आढळला (tiger found in sawantwadi). त्यामुळे विवरामधील पाण्यामध्ये बुडून तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे (tiger found in sawantwadi). सह्याद्रीत वाघाचा मृतदेह आढळल्याची ही गेल्या काही दशकांमधील पहिलीच घटना आहे. (tiger found in sawantwadi)
 
 
 
 
दाभीळ गावच्या स्थानिकांसोबत कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे हे सोमवारी सकाळी फिरण्यासाठी दुर्गम जंगलात गेले होते. त्यावेळी तिथल्या नदीच्या विवरामध्ये त्यांना वाघाचा मृतदेह आढळून आला. वन विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. साधारण एक तासाची पायपीट केल्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. नदीच्या नैसर्गिक कुंडामध्ये वाघाचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह पडल्याचे त्यांना आढळले. मृतदेह बाहेर काढून तपासणी केली असता तो मृतदेह वाघिणीचा असल्याचे लक्षात आले. वाघिणीने कुंडातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला. वनकर्मचाऱ्यांना तिच्या नखांचे ओरखडे कुंडाच्या कडांवर आढळून आले. मात्र, बाहेर न पडू शकल्याने कुंडातील पाण्यामध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. शिकारीचा पाठलाग करताना किंवा अनावधानाने वाघिण कुंडात पडल्याची शक्यता आहे. वाघिणीची नखे, दात सगळे सुस्थितीत असल्याने शिकारीसाठी तिला मारले नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाने त्याठिकाणीच मृतदेहाची विल्हेवाट लावली. मृतदेह मोठ्या प्रमाणावर कुजलेल्या अवस्थेत असल्याने शरीरावरील पट्यांच्या आधारे तिची ओळख पटू शकलेली नाही. या प्रकरणामुळे दाभीळ गावात वाघांचा वावर असल्याचे शिक्कामोर्तब झाले असून याठिकाणी धरण बांधण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे.