शोक प्रस्तावाच्या वेळी सभागृहात गदारोळ; मंत्री कोकाटेंच्या शिक्षेवरून दानवे संतापले, मुख्यमंत्र्यांचे शांततेत उत्तर
03-Mar-2025
Total Views |
मुंबई : (Maharashtra Budget Session 2025) राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. ३ मार्चपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला.
विधानपरिषदेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेचा मुद्दा उपस्थित केला. "मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. याबाबत सरकारची भूमिका काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावरून विरोधकांचा गदारोळ सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उठले आणि त्यांनी दानवेंना शांतपणे उत्तर दिले. "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असे होईल असे वाटले नव्हते, अशी खंत व्यक्त करत मंत्री महोदयांच्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केली असून हे प्रकरण क्लोज फॉर ऑर्डर ठेवले आहे. त्यांची ऑर्डर आल्यानंतर सभागृह किंवा राज्यपाल त्यावर निर्णय घेतील." असे त्यांनी सांगितले.