मतदारांनो त्वरीत मुले जन्माला घाला! एमके स्टॅलिनचा अजब फतवा

    03-Mar-2025
Total Views |
 
MK Stalin
 
चेन्नई (MK Stalin) : भारतात पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये मतदारसंघाचे सीमांकन होणार आहे. या अंतर्गत लोकसंख्येच्या आधारे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागांची संख्या आणि मतदारसंघांच्या सीमा पुन्हा निश्चित करण्यात आल्या आहेत. तामिळनाडू मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी यावर राजकारण सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे तामिळनाडू लोकसभेत कमी जागा होतील, असा दावा स्टॅलिन यांनी केला. सध्या तामिळनाडूत लोकसभेत ३९ जागा आहेत.
 
सीएम स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या जनतेला ताबडतोब मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून आगामी वर्षी लोकसंख्येवरून सीमांकनाच्या प्रभावाता समाना करु शकतील, तो म्हणाले की, मी नाही म्हणणार की तुमचा वेळ घ्या, पण लगेचच मुलं जन्माला घाला. ते म्हणाले की, कुटुंब नियोजन कार्यक्रमाने राज्याला आता तोटा निर्माण झाला आहे. लोकसंख्येच्या आधारावर सीमांकनामुळे केंद्रातील तामिळनाडूचे प्रतिनिधित्व कमी होईल, असे सांगून त्यांनी तमिळ लोकांना धमकावले आहे.