रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा! 'द रणवीर शो' पुन्हा सुरू करण्याची परवानगी
न्यायालयाकडून अटी आणि नियम लागू
03-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला (Ranveer Allahabadia) सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्याने मध्यंतरी एका इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात आई-वडील यांच्या संभोगाबाबत अश्लील वक्तव्य केले होते. त्यानंतर तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सुखद धक्का मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयने दि : ३ मार्च २०२५ रोजी त्याला आपले ' रणवीर शो' हा युट्यूबवरील पॉडकास्ट पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
रणवीर अलाहाबादियाने न्यायालयात दाद मागितली होती की, पॉडकास्ट हे त्याच्या उदारनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. म्हणूनच न्यायालयाने त्याची विनंती मान्य केली. परंतु आता त्याला काही अटी आणि नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्याने पॉडकास्टवर सर्व वयोगटातील लोकांसाठी कंटेंटची निर्मीती करावी, असे त्याने लिखित स्वरूपात वचन द्यावे. तसेच त्याला देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
न्यायालयाने सांगितले की, पॉडकास्टमध्ये इंडिया गॉट लेटेंट या कार्यक्रमामध्ये त्याने इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमाचा उल्लेख करू नये, अशी माहिती न्यायालयाने दिली आहे. अशातच आता न्यायालयाने दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन आता रणवीर कशापद्धतीने करेल याकडे त्याच्या चाहत्यांचे किंवा त्याच्या युट्यूब चॅनेल्सला सब्स्क्राइब करण्यात आलेल्या फॉलोवर्सचे याकडे लक्ष असणार आहे.