१५० हिंदू कुटुंबाच्या घराकडे जाणारा रस्ता कट्टरपंथी मुस्लिमांनी रोखला

    03-Mar-2025
Total Views |

Purnea
  
पाटणा : पूर्णिया शहरात सुमारे १५० हिंदू (Hindu) कुटुंबांच्या घरांकडे जाणारा रस्ता कट्टरपंथी मुस्लिमांनी रोखला आहे. या प्रकरणी आता एसडीएम आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करण्यात आले आहे. लोक म्हणत आहेत की, गावाभोवती कट्टरपंथी मुस्लिमांची खासगी जमीन आहे. ज्यामुळे गावाला बाहेर जाण्यास रस्ता नसल्याने त्यांच्या मुलामुलींचा विवाह होऊ शकत नाही. दरम्यान, एसडीएम न्यायालयाने हिंदूंना बाहेर जाण्यासाठी एक देण्याचा निर्णय दिला. मात्र नंतर दिवाणी न्यायालयाचा निर्णय बदलण्यात आला.
 
पूर्णियाच्या बैसी ब्लॉकमधील शादीपूर बुथा गावातील शर्मा टोलीत सुमारे १५० कुटुंबाच्या घरांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ते लोक मुस्लिमांच्या खासगी जागेतून रस्ता काढत जात असत, पण आता कट्टरपंथंच्या वस्त्या असल्याने मुस्लिम आपल्या खासगी मालकीच्या जागेतून हिंदूंना पायही ठेवू देत नाहीत. केवळ १०० मीटरपर्यंत रस्ता बांधण्यात आला आहे.
 
याप्रकरणात आता पीडितेचे म्हणणे आहे की, रस्त्यासाठी जमीन मालकाला १ लाख रुपये देण्यात आले होते. पण नंतर त्याच्यावर जबाव निर्माण केल्याने जमिनीच्या मालकाने पैसे परत केले आणि जमिनीतून रस्त्यासाठी विरोध केला. गावाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. ज्यामुळे आता युवक -युवतींचे विवाह होणे अवघड होऊन बसले. आजारपणातही त्यांना रुग्णालयात नेणे अवघड होऊन जाते. मुस्लिम पक्ष आता त्यांना पूजा अर्चना करण्यापासून तसेच लाऊडस्पीकर लावण्यापासून विरोध दर्शवतो.
 
अशातच शर्मा टोला येथे लोकांनी या रस्त्याच्या मागणीबाबत एसडीएम न्यायालयात तक्रार दाखल केली. एसडीएम न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला. पण त्यानंतर दिवाणी न्यायालयात हा निर्णय बदलण्यात आला असून संबंधित निर्णय हा मुस्लिमांच्या बाजूने देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशातच आता लोकांनी जिल्हा अधिकारी कुंदन कुमार यांना अर्ज दाखल करत गावापर्यंत रस्ता देण्याची मागणी करण्यात आली.
 
दरम्यान या प्रकरणात एसडीएम कुमारी तौसी म्हणाल्या की, कायद्याक लिहिण्यात आले होते की, जर १०० हून अधिक कुटुंबे असतील तर त्यांचा मार्ग खासगी असला तरीही तो रोखता येत नाही. इथे १५० हून अधिक कुटुंबे आहेत. त्यामुळे आता त्यांनी कसे रोखू शकता? असा सवाल उपस्थित करण्यात आला. मात्र अद्यापही कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.