राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या सातव्या बैठकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूषवले अध्यक्षस्थान

    03-Mar-2025
Total Views |

नरेंद्र मोदी 
 
गांधीनगर : नरेंद्र मोदी यांनी सोमवार दि : ३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या सातव्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीत ४७ सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला. या बैठकीत भारतातील डॉल्फिनसाठीचा पहिला अंदाज अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सादर करण्यात आलेल्या अहवालात एकूण ६ हजार ३२७ नदीतील डॉल्फिन असल्याचे समोर आले.

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील गिर वन्यजीव अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद लुटला आहे. जंगल सफारीचा आनंद घेत आपले फोटोशूटही केले. दुसऱ्या एका फोटोत नरेंद्र मोदी हातात कॅमेरा घेऊन सिंहाकडे पाहताना दिसतात. एक मादी सिंहिणी आपल्या बछड्याला मिठी मारताना दिसते.
 
 
 
नरेंद्र मोदी यांनी जुनागढमधील राष्ट्रीय वन्यजीव संदर्भ केंद्राची पायाभरणी केली. त्यांनी १६ व्या आशियाई सिंहांच्या लोकसंख्या अंदाजाची घोषणा केली. तसेच कोइम्बूतमधील सॅकॉनमध्ये मानव-वन्यजीवन संघर्षाला तोंड देण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगितले. 
 
तसेच बैठकीत पंतप्रधानांनी घोषणा केली की, मध्य प्रदेशातील अभयारण्यात आणि गुजरातमध्ये असलेल्या बन्नी गवताळ प्रदेशात चित्त्याचे अधिक प्रमाण वाढले जावे, यासाठी वन्यजीव संवर्धन कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारने आशियाई सिंहांच्या संवर्धनासाठी अर्थिक मंजूरी दिली. 
 
आशियाई सिंहांच्या संवर्धनासाठी १ हजार ९०० कोटींहून अधिक रक्कम मंजूर
 
केंद्र सरकाने आशियाई सिंहांच्या संवर्धनासाठी एका लायन प्रकल्पाअंतर्गत १ हजार ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मंजूर करण्यात आली आहे. आशियाई सिंह फक्त गुजरातमध्ये आढळतात, तसेच सध्या राज्यातील नऊ जिल्ह्यांतील ५३ तालुक्यांमध्ये सुमारे ३० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात राहतात.
 
गिर वन्यजीव अभयारण्याला नरेंद्र मोदींमुळे पर्यटन क्षेत्र म्हणून चालना मिळू शकते
 
दरम्यान, आता नरेंद्र मोदी यांच्या गिर वन्यजीव अभयारण्यामुळे जंगलसफारीचा आनंद लुटण्यात आला. त्यामुळे आता त्याला मोठ्या प्रमाणात पसंतीही दिली जाईल. जैवविविधतेकडे नव्याने लक्ष वेधले गेले आहे. गिर राष्ट्रीय अभयारण्याला पर्यटनासही चालना मिळू शकेल.