मुंबई: ( Legislative Council ) विधान भवनात नूतनीकरण करण्यात आलेल्या विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार, दि. ३ मार्च रोजी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री आणि आमदार उपस्थित होते.