बांगलादेशात हिंदू देव देवतांवर हल्ला करत मूर्तींची विटंबना
मंदिरात स्फोटक फेकल्याचा काळजीवाहू पुजाऱ्याचा दावा
03-Mar-2025
Total Views |
ढाका (Save Hindus) : बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदूंच्या मंदिरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यादरम्यान, देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. ही घटना सिराजगंजच्या काजूपूर उपजिल्ह्यात घडली आहे. शनिवारी १ मार्च २०२५ रोजी सोनामुखी बाजारपेठेत असलेल्या शिखा स्मृती सर्वजन दुर्गा मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. या मंदिराचे पुजारी जतिन कुमार कर्माकर यांनी सांगितले की, अज्ञातांनी बाहेरून मंदिराच्या आतमध्ये स्फोटक फेकले. यावेळी मूर्तींवर हल्ला करत मूर्तींची विटंबना करण्यात आली.
मंदिराचे काळजीवाहू जतिन कर्माकर म्हणतात की, दर रविवारी सकाळच्या दरम्यान मी मंदिरात पूजा करण्यासाठी जात असतो. यावेळी मी मंदिरात गेलो असता मला हिंदू धर्माच्या देवी देवतांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आली. या मंदिराला स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आलेले कुंपण आहे.
दरम्यान, ही घटना २ मार्च रोजी सकाळी एका प्रसारमाध्यमाने प्रसारीत केली होती. यानंतर काझीपूर उपजिल्हा कार्यकारी अधिकारी दिवाण अकरमुल हक आणि काझीपूर पोलीस ठाण्याच्या ओसी नूरी आलाम यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात नूरी आलम म्हणाल्या की, घटनेच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली. रात्रीच्या वेळी मंदिरातील पवित्र असलेल्या मूर्तींवर हल्ला करत तिचे पावित्र्य भंग करण्यात आले होते. तिची विटंबना करण्यात आली. अशावेळी सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्यासाठी तपास यंत्रणा सुरू आहे.