हिमानी नरवाल यांच्या हत्येप्रकरणात हरियाणा पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

संशियत दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

    03-Mar-2025
Total Views |
 
हिमानी नरवाल
 
चंदीगड : हरियाणा पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल (Himani Narwal) यांच्या हत्येप्रकरणात एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीचे नाव हे सचिन असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना सोमवारी या प्रकरणाची माहिती देण्यात आली. दरम्यान, शनिवारी १ मार्च रोजी रोहतकमध्ये नरवालचा मृतदेह एका सुटकेस बॅगमध्ये आढळल्याचे दिसून आले. त्या बॅगमध्ये तिच्या हाडांचे तुकडे पडले होते. रविवारी हरियाणा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही एका आरोपीला अटक केली त्यानंतर पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
रविवारी नरवालच्या कुटुंबाने तिच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आणि म्हटले की जोपर्यंत तिच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही. तोवर ते अंत्यसंस्कार करणार नाहीत. नरवालचे वय वर्षे २० असून त्या रोहतकच्या विजयनगरच्या स्थायिक होत्या. काँग्रेसच्या हरियाणा युनिटच्या नेत्यांनी नरवाल यांचा एक सक्रिय कार्यकर्ता असल्याचा उल्लेख केला होता. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेतही त्यांनी भाग घेतला होता. त्यांचे राहुल गांधींसोबतचे अनेक छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारीत होत आहेत.
 
 
 
दरम्यान, सुटकेसमध्ये त्यांचा मृतदेह पाहून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली होती. त्यामध्ये तपासादरम्यान, एका ओढणीने पीडितेचा गळा आवळला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. दरम्यान, आता पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच इतर दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,
 
या हत्येमागे नरवालने ब्लॅकमेलिंग केले असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे आरोपीने तिची हत्या केली होती. आरोपी हा नजीकच्या बहादुरगडाजवळील असणाऱ्या गावातील रहिवासी होता. या संदर्भात पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत विधान जारी केलेले नाही.