देहरादूनमधील चार बेकायदेशीर मदरशांना टाळे

प्रशासनाची कठोर कारवाई अवैध मशिदीवरही कारवाई

    03-Mar-2025
Total Views |
 illegal madrasas in Dehradun )
 
देहारादून: ( illegal madrasas in Dehradun ) उत्तराखंड सरकारने देहरादूनमध्ये कठोर कारवाई करत बेकायदेशीर मदरशांना टाळे ठोकण्यास सुरुवात केली आहे. पछुवा-देहरादूनमधील चार मदरसे बंद करण्यात आले असून बेकायदेशीरपणे बांधण्यात येत असलेल्या मशिदीलाही सील करण्यात आले आहे. विकासनगर उपजिल्हा अधिकारी विनोद कुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात अल्पसंख्याक विभाग आणि मदरसा बोर्डाचे अधिकारीही होते.
 
प्रशासकीय पथकाने धाकरानी येथील ‘मदरसा दार-ए-अक्रम’, ‘मदरसा मशिगुल रहमानिया’, ‘मदरसा फैजल उलूम’ आणि ‘नवाबगड’ येथील ‘दावतुल हक’ यांना सील केले आहे. हे मदरसे सरकारच्या परवानगीशिवाय चालू होते. मदरशांमध्ये मुलांसाठी बसण्याची मर्यादित जागा होती. तसेच, वीज, पाणी आणि इतर सुविधांचाही अभाव होता. धाकरानीच्या वॉर्ड क्रमांक ११ मध्ये प्रशासकीय परवानगीशिवाय बांधण्यात येत असलेल्या ‘अब्दुल बासित हदीसन’ मशिदीलाही प्रशासकीय पथकाने टाळे ठोकले आहे. विनोद कुमार यांच्या मते, जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय कोणतेही नवीन धार्मिक स्थळ बांधता येणार नाही किंवा जुने धार्मिक स्थळ दुरुस्त करता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. म्हणूनच या मदरशांना टाळे ठोकण्यात येत आहे.