कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर राज्यपाल निर्णय घेतील! मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

    03-Mar-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis Ambadas Danve
 
मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून विरोध सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. दरम्यान, कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत राज्यपाल निर्णय घेतील, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, ३ मार्च रोजी विरोधकांना दिले.
 
विधानपरिषदेत दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. पंरतू, त्याचवेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेचा मुद्दा उपस्थित करत "मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. याबाबत सरकारची भूमिका काय?" असा सवाल उपस्थित केला.
 
यावर विरोधकांचा गदारोळ सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उठले आणि दानवेंना शांतपणे उत्तर दिले. "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असे होईल असे वाटले नव्हते, अशी खंत व्यक्त करत मंत्री महोदयांच्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केली असून हे प्रकरण क्लोज फॉर ऑर्डर ठेवले आहे. त्यांची ऑर्डर आल्यानंतर सभागृह किंवा राज्यपाल त्यावर निर्णय घेतील," असे त्यांनी सांगितले.