दिल्लीकरांच्या सहभागाने मांडणार विकसित दिल्लीचा अर्थसंकल्प

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे प्रतिपादन

    03-Mar-2025
Total Views |
 
Developed Delhi budget to be presented with the participation of Delhiites
 
नवी दिल्ली:  ( rekha gupta on Delhi budget ) विशेष प्रतिनिधी दिल्लीचे भाजप सरकार २४ ते २६ मार्चदरम्यान विकसित दिल्लीसाठीचा अर्थसंकल्प मांडणार असून त्यासाठी दिल्लीकरांकडून सुचना मागविण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत केले आहे.
 
दिल्लीच्या नवनिर्वाचित भाजप सरकारने आता दिल्लीसाठी अर्थसंकल्प मांडण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या २४ ते २६ मार्चदरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून त्यामध्ये भाजप सरकार आपला पहिला अर्थसंकल्प मांडणार आहे. त्याविषयी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.
 
मुख्यमंत्री गुप्ता म्हणाल्या, दिल्लीकरांच्या आशाआकांक्षा पूर्ण करणार अर्थसंकल्प दिल्लीकरांच्याच सहभागातून तयार करण्यात येणार आहे. हिलांसाठी आर्थिक मदत, आरोग्य सेवांचा विस्तार, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे, प्रदूषण कमी करणे, यमुना स्वच्छता, रोजगार, ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण आणि इतर महत्त्वाचे मुद्दे आमच्या जाहीरनाम्याचा भाग होते. आता आमचे उद्दिष्ट दिल्लीतील लोकांच्या प्राधान्यक्रमांना विचारात घेणे आणि त्यानुसार अर्थसंकल्पाची रूपरेषा तयार करणे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. दिल्लीकरांना सुचना पाठविण्यासाठी ईमेल आणि व्हॉट्स एप क्रमांकही जारी करण्यात आला आहे.