गोरखपूरमध्ये मशीद समितीच्या ४ मजली बांधकामावर हातोडा

02 Mar 2025 15:32:46

अवैध मशीद
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये, मशीद समितीने घोष कंपनी चौकातील अबू हुरैरा मशिदीचे अवैध बांधकाम पाडण्याचे काम सुरू केले आहे. ही मशीद अवैधपणे बांधण्यात आली होती. गौरखपूर विकास प्राधिकारणाने १५ दिवसांपूर्वी अवैध बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. नोटीशीचा कालावधी संपल्यानंतर मशीद समितीने शनिवारी १ मार्च रोजी स्वत:च बांधकाम पाडण्यास सुरूवात केली.
 
गोरखपूरमधील घोष कंपनी चौकाजवळ महानगरपालिकेच्या जामिनीवर चार मजली मशिदीचे अवैधपणे बांधकाम करण्यात आले. ही अवैधपणे बांधण्यात आलेल्या मशिदीचे बांधकाम हटवण्यासाठी महानगरपालिकेने मशीद समितीला अनेक नोटीस बजावण्यात आल्या. काही महिन्यांपूर्वी बुलडोझर वापरून अवैधपणे अतिक्रमण हटवण्यात आले. अशातच त्याच जमिनीवर चार मजली मशीद पुन्हा बांधण्यात आली.
 
गोरखपूर विकास प्राधिकारणाने मशीद समितीला नोटीस बजावली. त्यानंतर १५ दिवसांच्या आत मशिदीच्या भोवतालचा परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले. ही नोटीस १५ फेब्रुवारी रोजी मशिदीची देखरेख करणाऱ्या शोएब अहमदला देण्यात आली आणि बेकायदेशीर बांधकाम हटवण्यासाठी सूचना देण्यात आल्या.
 
अवैध बांधकाम हटवण्याची मुदत संपल्यानंतर शनिवारी १ मार्च रोजी मशीद समितीच्या सदस्यांनी स्वत: बांधकाम पाडण्यास सुरूवात केली. आता त्याच जमिनीवर बहुमजली व्यावसायिक संकुल बांधले जाईल. गोरखपूरच्या शेजारी असणाऱ्या कशीनगर जिल्ह्यातील मदनी मशीद अलिकडेच बुलडोझरने पाडण्यात आली. त्यानंतर मेरठमधील ८५ वर्षे जुनी जहांगीर खान मशीदही पाडण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0