मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Elephant procession in Kerala) केरळमधील मंदिरांमध्ये हत्तींच्या मिरवणुकीवर आणि धार्मिक विधींमध्ये त्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात यावी यासंदर्भातील निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून यास स्थगिती देण्यात आली आहे. मंदिरांमध्ये हत्तींचा वापर हा आपल्या संस्कृतीचा भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात ही बंदी घातली. यानंतर 'गज सेवा समिती' नावाच्या स्वयंसेवी संस्थेने याविरोधात एक याचिका दाखल केली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. गज सेवा समितीने आरोप केला होता की, हत्तींवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांना हिंदूंच्या २ हजार वर्षांहून अधिक जुन्या परंपरा बंद करायच्या आहेत. हे कार्यकर्ते परकीय निधीच्या मदतीने काम करतात आणि ते हिंदूंच्या परंपरांना पायबंद घालत असल्याचा आरोप गजसेवा समितीने केला.