मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ramnavami in Ayodhya) श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने दि. ६ एप्रिल रोजी येणाऱ्या रामनवमीबाबत मोठी घोषणा केली आहे. प्रभू श्रीरामांची जयंती रामजन्मभूमीवर मोठ्या थाटामाटात साजरी केली जाणार असल्याचे मंदिर ट्रस्टने सांगितले. सोमवारी यासंदर्भात कार्यक्रमाची रूपरेषा प्रसिद्ध करण्यात आली.
हे वाचलंत का? : नागपूरातील हिंसाचारानंतर विहिंपची मोठी भूमिका!
मिळालेल्या माहितीनुसार, यादिवशी धार्मिक विधी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू होतील. सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत रामललाचा अभिषेक होईल. त्यानंतर सकाळी १०.३० ते १०.४० (दहा मिनिटे) ते साडेदहा या वेळेत दहा मिनिटे पडदा झाकला जाईल. १०.४० वाजल्यापासून प्रभू रामलालांचा शृंगार सुरू होईल.
अशी माहिती आहे की, शृंगार दरम्यान दर्शन सतत सुरू राहणार आहे. याचवेळी रामललास नैवेद्य दाखवला जाईल. दुपारी ठीक १२ वाजता रामललांची आरती व सूर्य टिळकाने रामललांचा मस्तकाभिषेक होईल. भक्तांना घरबसल्या दूरचित्रवाणीवरील संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. दरम्यान मंदिरात वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानस यांचे पठण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.