वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रातील ओव्हरहेड वीज तारा पुढील २ वर्षात भुमिगत करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

18 Mar 2025 15:03:16
 
Overhead power lines in Vasai-Virar Municipal Corporation area will be buried in the next 2 years
 
( Overhead power lines in Vasai-Virar Municipal Corporation area will be buried in the next 2 years ) वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रातील ओव्हरहेड वीज तारा पुढील २ वर्षात टप्प्या-टप्प्याने भुमिगत करणार अशी माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आमदार राजन नाईक यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना दिली. वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ओव्हरहेड वायरर्स असल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे ओव्हरहेड वायरर्सवर पडून वीज वारंवार खंडित होते. यामुळे या वायरर्स भुमिगत करण्यात याव्यात या संदर्भात आमदार राजन नाईक यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
 
 
यावर आज सभागृहात चर्चा झाली असता वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात RDSS या योजनेंतर्गत पुढील २ वर्षात टप्प्या-टप्प्याने ओव्हरहेड विजतारा भुमिगत करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. त्याचप्रमाणे वसई-विरार समुद्र किनारपट्टी भागातील व जंगलातून जाणाऱ्‍या उपरी तार वाहिन्या भूमिगत करण्यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरणांतर्गं रु.२११.५५ कोटींचा प्रकल्प अहवाल शासनाने मंजूर केला असून सप्टेंबर पर्यंत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल‌‌ असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. ही घोषणा केल्याबद्दल आमदार राजन नाईक यांनी मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले.
 
 
Powered By Sangraha 9.0