मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Abu Azmi on Nagpur Violence) "ज्या नागपूरमध्ये कधीच सांप्रदायिक दंगल झाली नाहीत तिथे असा हिंसाचार झाल्याने मला दुःख होत आहे.", असे मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी व्यक्त केले आहे. त्यांनी एका व्हिडिओद्वारे लोकांना शांतता ठेवण्याचे व खोट्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ज्या अबू आझमींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान क्रूरकर्मा औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली, तेच आज नागपूर हिंसाचारावर मगरीचे अश्रू वाहताना दिसत आहेत.
हे वाचलंत का? : जिहादी कारवायांना उघडपणे समर्थन; 'या' प्रसिद्ध चॅनलवर होणार कारवाई
ते म्हणाले की, "या हिंसाचारात अनेक जण जखमी झालेत, ही गंभीर बाब आहे. रमजानचा पवित्र महिना सुरु आहे, त्यामुळे कोणाच्याही भडकाऊ भाषणावर भूलू नका. आपल्याला शांतता ठेवायची आहे. शांततेच्या मार्गानेच देशाला पुढे घेऊन जायचं आहे. आणि त्यासाठी आपापसांत लढून चालणार नाही." पोलिसांकडून सध्या तपास सुरू असल्याने कोणीही कायदा हातात न घेण्याचे आवाहन अबू आझमींनी केले आहे.