औरंग्यांच्या अवलादींचा छावा चित्रपटाला विरोध! चित्रपटाविरोधात घेतली 'अशी' भूमिका

    13-Mar-2025
Total Views |

muslim federation of andhra pradesh seeks banned on telugu release of chhaava
 
नेल्लोर : (Chhaava Telugu Release) लक्ष्मण उतेकर दिग्दर्शत आणि विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनीत ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट सध्या देशभरात धुमाकूळ घालत आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. चाहत्यांच्या प्रचंड मागणीनंतर ‘छावा’ हा चित्रपट तेलुगू भाषेतही प्रदर्शित करण्यात आला. तेलुगू भाषेत प्रदर्शित होण्यापूर्वी काही कट्टरपंथी संघटनांकडून ‘छावा’ चित्रपटाच्या तेलगु भाषेच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे.
 
आंध्र प्रदेशमधील मुस्लिम फेडरेशनने नेल्लोर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत ‘छावा’ चित्रपटाच्या तेलुगू भाषेतील प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली होती. या संघटनेने चित्रपटाच्या आशयाबाबत प्रश्नचिव्ह उपस्थित केले आहे. आंध्र प्रदेशातील मुस्लिम फेडरेशनचे अध्यक्ष मोहम्मद झियाउल हक यांनी नेल्लोर जिल्हाधिकाऱ्यांकडे औपचारिकपणे याचिका दाखल केली आहे आणि तेलुगू राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये अशी मागणी केली. चित्रपटात ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.
 
दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाला अशा विरोध होण्याची ही पहिलीच वेळ नाही. चित्रपटाच्या हिंदी प्रदर्शनावेळीही अशाच प्रकारची टीका झाली होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाला आणि आकडेवारीनुसार, चित्रपटाने ५०० कोटींचा आकडा ओलांडला आहे.