होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही.
होळीच्या निमित्ताने उत्तर प्रदेश आणि बिहारचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यावर्षी होळी शुक्रवारी आहे आणि शुक्रवारी जुम्म्याचा नमाज असतो. त्यामुळे वाद सुरू झाले आहेत. खरे तर, हा वाद नाहीच. मात्र, या देशात हिंदू सोडून बाकी सर्व धर्मीयांच्या धार्मिक भावना सांभाळण्याचा एक रिवाज होता. त्यातून लाडवलेल्यांचा एक गट तयार झाला आणि या गटाला काहीही झाले, की ‘इस्लाम खतरे मे’ असे वाटायला लागते. ‘शुक्रवारी आपल्या अंगावर रंग पडला, तर आपण नमाज पढण्यास पवित्र राहणार नाही,’ असा एक विचित्र दावा, उत्तर भारतातल्या मुसलमानांनी केला आहे. खरे तर, आजच्या बदललेल्या उत्तर प्रदेशात, असल्या आचरट तर्कांना वाव नाही. मात्र, पूर्वी यांचे इतके लाड झाले आहेत की, ही मंडळी काहीही बोलत राहतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, आपण मुसलमानांना ‘प्रेमाने समजावल्या’चा दावा केला आहे. भारतभरातल्या सर्वच धर्मांध मुस्लिमांना ‘योगी स्टाईल’ने प्रेमाने समजावण्याची गरज आहे. वरवर पाहता हा संघर्ष आजचा वाटत असला, तरी तो जुनाच आहे. हिंदूंच्या शोभायात्रा, गणेश चतुर्थी, रामनवमी अशा मिरवणुका ही धर्मांध मुस्लिमांना दंगे करण्याची, हिंदूंची घरे-दारे व दुकाने लुटण्याची संधी वाटते. सणावारांना फटाके वाजवायचे नाहीत, वाद्ये वाजवायची नाहीत, असे हे विचित्र तर्कट आहे.
आपल्या देशातल्या तथाकथित पुरोगाम्यांना हे असले तर्कट मान्य करणे म्हणजे सर्वधर्मसमभाव वाटतो. जसजसे आपण याच्या तपशिलात जायला लागतो, तसतसे खरे चित्र बरोबर उलट असल्याचे आपल्या लक्षात येते. हिंदूंच्या सणावाराला कंदील, फटाके, फुगे, रंग, पणत्या, रांगोळी, पतंग, मांजे, वाद्ये या सगळ्यांचे विक्रेते म्हणून सर्वसामान्य मुस्लीम उभे राहणार, मात्र हिंदूविरोधी कारवाया करणारे धर्मांध मुसलमान आपल्या कारवायांना अंजाम देत असताना हे सगळे चिडीचूप राहणार, असे यापुढे या देशात चालणार नाही. इकबाल शेख फसवून तिसरे लग्न करून रुपाली चंदनशिवेचा निर्घृण खून करतो, मुंबई व देशात वातावरण बिघडते, मात्र सुशिक्षित व तथाकथित पुरोगामी व मुस्लीम समुदायाकडूनही धिक्काराचा एक साधा सूरही उमटत नाही. एरव्ही जगाला ‘सेक्युलॅरिजम’चे डोस देणारे जावेद, शबाना चिडिचूप असतात. ’सत्यमेव जयते’चा डांगोरा पिटणारा आमीर निवांत असतो, असुरक्षित वाटणारा नसीरुद्दिन स्वतःच्या सुरक्षित घरी गपगार झोपलेला असतो, ही सगळी मंडळी दांभिक आणि कोडगी आहेत, हे इथे लक्षात येते.
मुलांच्या परीक्षा असो, कुणाच्या घरी सुतक असो, मशिदीवरचा भोंगा मात्र वाजणारच. त्यांना कुणीही रोखायचे नाही. कुणी थांबवायला गेले, तर वस्त्यांमधल्या पुरुषांसकट महिलाही हिंसक होऊन अंगावर येतात. मानखुर्दमधल्या करिश्मा भोसले या विज्ञानाच्या विद्यार्थिनीचाही असाच अनुभव होता. मात्र, यावेळीसुद्धा वर उल्लेखलेली सगळी मंडळी चिडीचूप होती. हिंदूंच्या सणाप्रमाणे मुस्लिमांचेही अनेक सण साजरे होतात. यातले बहुसंख्य सण हे हिंसकच असतात. बकरी ईदला होणारा रक्तपात हा असाच हिंसक विषय. गृहनिर्माण संकुलांमध्ये बकरे आणून ठेवण्यापासून ते बासी ईदनंतर खूर, कान, शिंगे सोसायट्यांमध्ये सापडण्यापर्यंत सगळे प्रकार चालतात. केंद्रात मोदींचे सरकार आल्यानंतर गोवंश काही प्रमाणात बचावला; मात्र चोरट्या पद्धतीने त्याची हत्या होतच असते. वस्तुतः गोवंशांच्या बळीला इस्लाममध्येसुद्धा कोणताही आधार नाही. मात्र, तरीसुद्धा हे प्रकार चालूच असतात. सर्वधर्मसमभावाची संकल्पना मांडणारे लोक, वागत असताना मात्र ते विचित्रच वागतात आणि यांचे विचित्र वागणे सदैव हिंदूंवर अन्यायकारकच असते.
२०१४ साली जे मूलभूत राजकीय परिवर्तन झाले, त्यामुळे हिंदूंच्या या देशाचे घटनादत्त नागरिक म्हणून अशा पल्लवित झाल्या आहेत. महाराष्ट्रातही हिंदूंच्या न्याय्य हक्काची पायमल्ली होऊ न देणारे सरकार, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आले आहे. होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या दोन घटना हिंदूंच्या दृष्टीने आशादायक आहेत. मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची भाषा अनेकांनी केली, ते आजवर उतरवता मात्र कुणालाही आलेले नाहीत. या विषयात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून, आता स्वतः उतरले आहेत. दिवसभर काम करून रात्री विश्रांतीसाठी पाठ टेकवणारे कष्टकरी, पहाटे उठून कामाला लागणारे चाकरमानी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांनाच या भोंग्याचा त्रास आहे. भोंग्यांना सरसकट परवानगी न देण्याचे व तक्रार आल्यास भोंगे जप्त करण्याची भूमिका त्यांनी विधिमंडळासमोर स्पष्ट केली आहे. विधिमंडळासमोर बसून रमजानचे रोजे सोडणार्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या बातमीमुळे, मुंबईत पहिल्यांदाच हटकले गेले. शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मजारी बांधण्यापासून ते थेट विधिमंडळासमोरच्या पदपथावर रोजे इफ्तारी करण्यापर्यंत, मुस्लिमांमधील एका वर्गाला मोठा रस असतो. हे काय कोडे आहे, ते एकदा उकलून पाहिले पाहिजे आणि त्याला पायबंदही बसवला पाहिजे. होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही.