डोंबिवलीत रंगणार तरूणाईचा होलिकोत्सव!

13 Mar 2025 17:33:42

dombivli 11
 
मुंबई : चतुरंग प्रतिष्ठान प्रस्तुत होलिकोत्सव ' रंग आमुचा वेगळा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता डोंबिवली पूर्व येथील टिळकनगर परिसरातील सुयोग मंगल कार्यालय, येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 'दोस्त म्हणतो' या सदराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विजय बेंद्रे, मेघांत, रोहन कोळी, इंद्रजित उगले, आकाश सावंत, हे कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.
 
होलिकोत्सवाच्या या कार्यक्रमात ' चिंतन - संत तुकारामांचे' या विषयावर युवा कीर्तनकार ह.भ.प. मोहन रायकर श्रोतृवर्गाला मार्गदर्शन करतील. यावेळी संवादिनीवर त्यांना वासुदेव रिसबूड साथ करतील,तर सुशील पाठक तबला वादन करणार आहेत.
 
Powered By Sangraha 9.0