मुंबई विभागातील साडेसहा हजार शिक्षकांना थकीत बिलांची रक्कम मिळणार अनिल बोरनारे

56 कोटींची सप्लिमेंट बिले मंजुरीसाठी शिक्षण संचालकांकडे अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

    13-Mar-2025
Total Views |
 
अनिल बोरनारे
 
 
मुंबई: ( अनिल बोरनारे )  मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग तसेच ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील साडेसहा हजार शिक्षकांना ५६ कोटीहून अधिक प्रलंबित थकीत बिलांची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार असून मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
 
ही बिले मंजुरीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे शिक्षक शिक्षकेतरांची अनेक प्रकारची थकीत बिले तातडीने तपासून शिक्षण संचालकांकडे पाठवून मार्चपूर्वी बिलांना मंजुरी घेऊन शिक्षकांच्या खात्यात रक्कम जमा करा या मागणीसाठी मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम व दक्षिण शिक्षण निरीक्षक कार्यालयातील वेतन पथक अधिक्षक तसेच ठाणे पालघर रायगड वेतन अधिक्षक यांच्याकडे तगादा लावला होता याबाबत बोरनारे यांनी मुंबई विभाग शिक्षण उपसंचालक संदीप संघवे यांचीही भेट घेऊन शिक्षकांच्या थकीत बिलांना मंजुरी द्यावी, थकीत बिलांची संख्या पाहता प्रसंगी जादा कर्मचारी उपलब्ध करून वेळेत कामे पूर्ण करून अनेक वर्षांपासून असलेली थकबाकी शिक्षकांना द्या असे निवेदन दिले होते. आज याबाबत शिक्षण उपसंचालकांनी ही सर्व बिले मंजुरीसाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविले असल्याचे लेखी पत्र अनिल बोरनारे यांना सुपूर्द केले.
 
वरिष्ठ वेतन श्रेणी, निवडश्रेणी, शिक्षण सेवक कालावधी, नियमित वेतन खंड, सेवाजोडणी यासह अन्य प्रकरणातील थकीत बिले महिनोमहिने तर काही प्रकरणात अनेक वर्षांपासून बिले प्रलंबित राहतात शिक्षण विभागाकडून विनाकारण त्यात त्रुटी दाखवून त्याची पूर्तता करा असे सांगून शाळेकडे बिले परत पाठविली जातात यामध्ये शाळेतील कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागतात व मनस्ताप सहन करावा लागतो असे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

जिल्हानिहाय शिक्षकांची संख्या व रक्कम
 
मुंबई दक्षिण विभाग १ हजार ८१५ शिक्षक-शिक्षकेतरांची १४ कोटी १६ लाख ८९ हजार १२७ रुपये रक्कम
 
मुंबई पश्चिम विभाग ६९८ शिक्षक- -शिक्षकेतरांची ४ कोटी २१ लाख ४६९ रुपये रक्कम
 
मुंबई उत्तर विभाग १ हजार ७०० शिक्षक-शिक्षकेतरांची १९ कोटी रुपये रक्कम
 
ठाणे प्राथमिक ६८९ शिक्षक- -शिक्षकेतरांची ६ कोटी ३८ लाख २० हजार १२९ रुपये रक्कम
 
ठाणे माध्यमिक ६६६  शिक्षक-शिक्षकेतरांची
 
५ कोटी ३२ लाख ६७ हजार २२९  रुपये रक्कम
 
पालघर माध्यमिक ४६३ शिक्षक-शिक्षकेतरांची ७ कोटी २८ लाख ९५ हजार १८८ रुपये रक्कम
 
रायगड माध्यमिक ६७९ शिक्षक-शिक्षकेतरांची ६७ लाख 11 हजार ३०७ रुपये रक्कम