गुढीपाडव्याला ठाकरे बंधू एकत्र येणार? बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल

13 Mar 2025 17:37:45
 
Uddhav Thackeray Raj Thackeray
 
मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाठा गटाचा सुपडासाफ झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी ईच्छा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याच अनुषंगाने सध्या एक निमंत्रण पत्रिका माध्यमांमध्ये व्हायरल होत असून बंधू मिलन कार्यक्रम असे या पत्रिकेचे नाव आहे. मोहनिश रविंद्र राऊळ नामक व्यक्तीने ही निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ठेवली आहे.
 
हे वाचलंत का? -  झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करताना मंदिरांचे संरक्षण करावे! मंत्री मंगल प्रभात लोढांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
 
"बंधू मिलन निमंत्रण, भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार. बंधू मिलन कार्यक्रम दिनांक ३० मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल," असे या निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. मुंबईतील मराठी सेनेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0