खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर! वनविभागाकडून घर जमीनदोस्त
13-Mar-2025
Total Views |
बीड : बीडमधील मारहाणप्रकरणी चर्चेत असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आले आहे. त्याचे घर वनविभागाच्या जागेवर असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
सतीश भोसले याने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून तो फरार होता. तेव्हापासूनच पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून त्याला प्रयागराजमधून अटक केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वनविभागाकडून खोक्याच्या घराची झडती घेण्यात आली होती, यावेळी त्याच्या घरातून जनावरांचे सुखलेले मांस आणि शिकारीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच त्याचे घरही वनविभागाच्या जमिनीवर असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता त्याच्या घरावर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त करण्यात आले आहे.