आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? पोलिसांकडून तपास सुरु

    12-Mar-2025
Total Views |
 
Krushna Andhale Santosh Deshmukh
 
नाशिक : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. नाशिकमधील स्थानिक नागरिकांनी कृष्णा आंधळेला पाहिल्याचा दावा केला आहे.
 
कृष्णा आंधळे नाशिकच्या गंगाखेड रोडवरील सहदेव नगरमधील दत्त मंदिराजवळ दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. कृष्णा आंधळेसोबत आणखी एकजण असून ते दोघेही गाडीवर बसून पसार झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. आहे. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कृष्णा आंधळेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमधून अटक होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? - मविआ सरकारमध्ये प्रविण दरेकरांना अटक करण्याचा प्लॅन! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट
 
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे हा एक मोठा आरोपी असून गेल्या तीन महिन्यांपासून ते फरार आहे. सीआयडीने बीड सत्र न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात संतोष देशमुखांना मारताना कृष्णा आंधळेने चारवेळा व्हॅाट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हिडीओ कॉल केल्याची माहिती दिली होती. दरम्यान, आता कृष्णा आंधळेच्या मुस्क्या आवळण्यात पोलिसांना यश येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.