खेलत रघुपती होरी हो..…..हरिगुण गावो ताल बजावो Iखेलो संग हमजोली मे I I

    12-Mar-2025
Total Views |
 
Holi Festival
 
 
खेलत रघुपती होरी हो..…..
हरिगुण गावो ताल बजावो I
खेलो संग हमजोली मे I I
 
जनचेतना जागृती पर्व,म्हणजे होळी.संपूर्ण भारतभर पौराणिक काळापासून हा उत्सव मोठया उत्साहाने साजरा होतो.या लेखात प्रभू रामचंद्राची अयोध्येतील होळी,भगवान श्रीकृष्णाची वृंदावनातील होळी तसेच भगवान शंकर व पार्वतीची होळी या संबंधी उपलब्ध काव्य संकलन केले आहे.
 
जाती पातीची बंधने गळून पडणारे जे उत्सव आहेत त्यात होळी हा प्रमुख सार्वजनिक उत्सव आहे.परस्परांविषयीं कटुता विसरून मधुर अनुराग स्थापन करण्याचा हा दिवस आहे.म्हणूनच या सणाला एकता,समन्वय व सदभावनांचे राष्ट्रीय पर्व म्हणायला पाहिजे.
हिवाळ्याच्या थंडीने काकडलेली धरती होळीच्या दिवसात उब प्राप्त करून ताकतवान व टवटवीत होते.प्रकृती प्रसन्न होते.कविंच्या लेखण्यांना धार प्राप्त होते.त्यांच्या भावना काव्याद्वारे प्रगट होतात.उत्तर प्रदेश,बिहार भागात टोळीटोळीने बाल गोपाल,तरुण मंडळी ढोल ताशे वाजवत होळीची गाणी म्हणतात.या मस्त धुंद पण खेळकर गाण्यांना "फगवे " म्हणतात..फगवे गात एकमेकांच्या घरी जाऊन प्रत्येकाला टोळीत सामील करून घेतात.ही गाणी विशिष्ट पारंपारिक पद्धतीने व चालीत खेळकरपने म्हणत असताना परस्परांना गुलाल लावतात.एकमेकांना मिठीत सामावून प्रेमाच्या नशेत चूर करतात.
वानगीसाठी खालील गाणी देत आहो.
 
होलिका त्योहार मनावे I लेकर अबीर झोलीमे I
निकले मिल जुलकर टोली मे I
बीती बातोंको बिसराकर I सब गले मिले होली मे I
पिचकारी भर भर कर I
सबको हंसकर तिलक लगाये I आवो मिलकर होली मनाये I
 
ग्रामीण संस्कृतीचा अधिकाश पगडा असलेल्या या देशात लोकगीतानी वातावरण प्रसन्न व प्रफुल्लित होते.लोकगीतांनी तळागाळापर्यंत राष्ट्रोन्नतीचा,उत्कर्षांचा,समतेचा संदेश पोहोचतो.हा अनुभव आहे.सर्व संतांनीही हाच मार्ग अवलंबीला होता.
हसरत रिसालपुरी लिहितात :-
 
मुखपर गुलाल लगावो I नयनन को नैनोसे मिलावो I
बैर भूलकर प्रेम बढावो I सबको आत्मज्ञान सिखावो I
ओ प्यार की बोली बोले हौले हौले होली खेले I
 
त्याच प्रमाणे प्रभू राम, श्रीकृष्ण,शंकर पार्वती यांच्या खेळाची वर्णने असलेली फगवे फार प्रचलित आहेत.विविध कवीनी रचलेल्या या रचना म्हणत होळी खेळल्या जाते.
 
अयोध्येत राम,लक्ष्मण,भरत व शत्रुघ्न हे चार भावंडे एकीकडे,तर दुसरीकडे सीता,उर्मिला,श्रुतकीर्ती व मांडवी या मैत्रिणी समवेत दुसरीकडे होळी खेळत असतात.
 
खेलत रघुपती होरी हो,संगे जनक किसोरी I इत राम,लखन,भरत शत्रुघन I उत जानकी संग गोरी,केसर रंग चोरी I छिरकत जुगल समाज परस्पर मलत I मुखन मे रोगी वाजत तृत तोरी I वाजत झाँज,मिरिगंद,ढोल,झप गृह I गह भये चहूँ ओरी,नवसाज सजोरी I
साधव देव भये,सुमन सुर बरसे जय जय I
चहू ओरी,मिथलापूर खोरी I
 
अयोध्येत केशरयुक्त रंग दोन्ही बाजूनी परस्परांवर टाकल्या गेला. तोंडाला रंग फासून घेताना युवती लाजेने चूर होतात.झाँज,मृदंग,ढोल,डफ ई.वाद्यांनी रंगाचा नशा वाढतो आहे.सर्व दिशा आनंदाने पल्लवीत झाल्या आहेत.देवतागण आकाशातून पुष्पवृष्टी करीत अयोध्येतील हा रंगोत्सव पाहतात. दुसऱ्या काव्यकथनात प्रभू राम व सीता अयोध्येत होळी खेळतात.भरत - लक्ष्मण - शत्रुघन -हनुमान यांच्या टोळ्या बनतात,पखवाज राग छेडीत आहे.प्रेमाच्या उमाळ्यात सर्व गातात,त्या समयीचा फगवा पुढीलप्रमाणे.:-
 
खेलत अवधपुरी मे फाग I रघुवर जनक लली I
भरत,शत्रूघन,लखन,पवनसूत I मूध मूध लिए भाग I
वाजत अनहत ताल पखवाज I उमगि उमगि अनुराग I
गावत गीत भली I
भरि भरि धार,अरगवा चंदन केसरिया भरि भरि I
अबरख,अबीर,गुलाल,कुमकुवा I सीस रंगा लिए पाग I
केसर काच भली I
 
तिकडे हिमालयात शिव -पार्वतीच्या होळी चे वर्णन :-
 
आज सदाशिव खेलत होरी I जटा जूट मे गंगा विराजे I
अंग मे भस्म रमोरी I वाहन बैल,ललाट,चंद्रमा I
मृगछाला अरु डोरी I तिन्ही आखि सुंदरI चमकेला सरप गले
निपटोरी I अदभूत रूप उमस जे जउरीI संग मे सखी करो री I हंसते लजते मु्सुकाता चंदरमा सभी, सिधी इकहोरी Iलेई गुलाल संभू पर छिरके,रंगमे उनके बोरी I भंड.ल लाल सभी देहू, संभुके गउरी करे ठिठोरी I
 
शिवजीच्या जटेत गंगा,शरीरावर भस्म,नंदीवर स्वार,कपाळावर चंद्र,अंगाभोवती मृगजीन,चमकते डोळे व गळ्यात सर्प या अश्या ध्यानस्वरूपातील शिवा बरोबर पार्वती आपल्या सख्यांबरोबर रंग व गुलाल उधळून होळी साजरी करते. सर्व रंगात रंगून बेरंग राहिलेला नटरंग गोपाळकृष्ण याच्या होळी वर्णनाशिवाय हा रांगोत्सव पूर्णच होत नाही
वृंदावनात गोप -गोपिकांसोबत होळी खेळतानाचे वर्णन :-
 
आज बिरज मे होरी रे रसिया,होरी रे रसिया,बरजोरी रे रसिया I
उडत गुलाल लाल भए बादर,केसर रंग मे बोरी रे रसिया I
बाजत ताल मृदंग झाँज ढप,और मजीरन की जोरी रे रसिया I
 
नंतर तो नंदगोपाल आपल्या सख्यांना चुनौती देतो की होळीच्या खेळात मला जिंकून दाखवा.सर्व गोप गोपी संकोच सोडून होळी खेळतात.
 
होरी खेलूंगी श्याम तोसे नाय हारू I उडत गुलाल लाल भए बादर I भर गडुवा रंग की डाऊ I होरी मे तोरा,गोरी बनाऊ लाला I पाग झगा तरी फारू I औचक छतियन हाथ चलावे I
तोरे हाथ बांधी,गुलाल मारू I 
एव्हढे असले तरी राधेसोबत खेळाची रंगतच न्यारी! 
 
होरी खेलत राधे I किसोरी बिरिजिया के खोरी,केसर रंग कमोरी,घोरी कान्हे अबीरन झोरी I उडत गुलाल लाल भये बादर रंगवा कर जमुन बहोरी,बिरिजवा के खोरी I लाल लाल सब ग्वाल भये I लाल किसोर किसोरी,भीजि गईल राधे कर सारी,कान्हा कर भीजि पिछोरी बिरिजवा के खोरी I
 
प्रत्यक्ष देवांच्या होळीतील फगवे गात उत्तर प्रदेश,बिहार मधील रसिक होळी साजरी करतात. होळी च्या प्रसंगी चित्रपटात देखील अनेक सुंदर गाणी बसवली आहेत.त्यांचा देखील वापर होळी खेळताना करतात.त्यातील काही गाजलेली गाणी देण्याचा मोह आवरत नाही.
 
(१)होली आई रे कन्हाई,होली आई रे (मदर इंडिया )
(२)खेलो रंग हमारे संग,आज दिन (आन )
(३)होली खेलत नंदलाल,बिरजमे ( गोदान )
(४)तन रंग लो जी अजी मन रंगलो (कोहिनूर )
(५) आज न छोडेंगे ए हमजोली (कटीपतंग )
(६)रंग बरसे भीगी चुनरवाली ( सिलसिला )
(७) अरे जा रे हट नटखट ( नवरंग )
(८)होली के दिन मिल जाते है ( शोले )
 
अशा रितीने गाण्याच्या साथीत रंगाची उधळण करून या देशात सुख शांती व आनंदाचे वातावरण निर्माण करू.
रमेश विनायक पोफळी
पुणे
भ्र.क्र.7775900824.