मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमधील 'या' संघटनांवर ५ वर्षांची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाची मोठी कारवाई
12-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अवामी कृती समिती, जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन या दोन संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा निर्णय ११ मार्च २०२५ रोजी घेण्यात आला असून ज्यात त्यांना UAPA १९६७ या कलमांतर्गत त्यांना बेकायदेशीर असल्याचे घोषित केले. एएसीचे नेते मिरवाईज उमर फारूख आहेत आणि जेकेआयएमचे नेते मसरुद अब्बास अन्सारी आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे म्हणणे आहे की, संबंधित संघटना ही भारताला जम्मू आणि काश्मीपासून विभक्त करण्याचा डाव रचत आहे, शिवाय दहशतवादाला प्रोत्सहान देणे, भारताविरोधी घोषणा देणे, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी लोकांना चिथावणीखोर आरोप करण्यात आले आहेत.
‘Jammu & Kashmir Ittihadul Muslimeen’ and ‘Awami Action Committee' have been declared unlawful associations under UAPA. These organizations were found inciting people to cause law and order situations, posing a threat to the unity and integrity of Bharat.
गृहमंत्री अमित शाह यांनी एक ट्विट शेअर केले असून त्यात लिहिण्यात आले की, "संबंधित संघटना या देशाच्या एकता आणि शांततेसाठी धोकादायक आहेत. जे कोणी देशाविरोधात वाईट कृत्य करेल. देशद्रोहाचा अवलंब करेल, त्याला मोदी सरकारकडून कठोर शिक्षा दिली जाईल". दरम्यान, २०११ मध्ये सपाला पाठिंबा दिल्याबद्दल दगडफेकीला चिथावणी दिल्याबाबत उमर फारूखवरही गुन्हे दाखल झाले आहेत.
"जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन आणि अवामी कृती समितीचे सदस्य लोकांमध्ये असंतोषाचे बीर पेरणे, कायदा आणि सुव्यवस्था अस्थिर करणे, जनतेची माथी भडकावणे, विध्वंसक कारवायांमध्ये सामिल होत जम्मू आणि काश्मीरला भारतापसून विभक्त करण्यासाठी प्रोत्सहान देण्याच्या उद्दिष्टाने काम करत आहेत",असे गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलेले आहे.