भेसळयुक्त पनीर विक्रीवर आळा बसणार! विक्रम पाचपूतेंची लक्षवेधी; सभागृहात काय घडलं?

    12-Mar-2025
Total Views |
 
Vikram Pachpute Ajit Pawar
 
मुंबई : विक्रम पाचपूते महाराष्ट्रात भेसळयुक्त पनीर विक्रीवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असून अशा पनीर विक्रीला आळा बसणार आहे. बुधवार, १२ मार्च रोजी आमदार विक्रम पाचपूते यांनी लक्षवेधीमार्फत विधानसभेत हा प्रश्न विचारला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कारवाईचे आश्वासन दिले.
 
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल पनीरची विक्री सुरु आहे. राज्याच्या बाहेरून येणाऱ्या उत्पादनांवर काय कारवाई करणार आणि बनावट पनीर विक्रीवर काही निर्बंध आणणार आहात का? असा सवाल विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केला.
 
हे वाचलंत का? -  विधान भवनासमोरचा पदपथ ‘रोजा’मुक्त!
 
यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "महाराष्ट्रात बनावट पद्धतीचे पनीर विक्रीस असणे, ही मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून या गैरप्रकाराची सखोल चौकशी केली जाईल. संबंधित मंत्री, राज्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठोस कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील. तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन देणार आहे. संबंधित सर्व विभागांना विश्वासात घेऊन फेक पनीरबाबत तातडीने कारवाई केली जाईल. आवश्यकता असल्यास केंद्राशी संबंधित मंत्र्यांना भेटून त्यांचीही संमती घेतली जाईल. अधिवेशन संपण्याच्या आधी यावर ठोस कारवाई केली जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले.