वसंतोत्सव २०२५ मध्ये पद्मश्री ह्रदयनाथ मंगेशकर यांचा सन्मान!
11-Mar-2025
Total Views |
मुंबई : भारतीय संगीतक्षेत्रात स्वताची वेगळी ओळख निर्माण करत, आपल्या कार्यतून भारतीय संगीत शास्त्रावर ठसा उमटवणाऱ्या पद्मश्री ह्रदयनाथ मंगेशकर यांना प्रतिष्ठेचा 'उत्तम वाग्गेयकर पुरस्कार' दि.९ मार्च रोजी प्रदान करण्यात आला.आचार्य जियालाल वसंत संगीत निकेतनच्यावतीने अजीवासन हॉल जुहू येथे आयोजित वसंतोत्सव २०२५ या कार्यक्रमात त्यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. त्याच बरोबर ख्यत्नाम गायक सुरेश वाडकर, प्रेम वसंत, पद्मा वाडकर, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ गायक अनुप जलोटा, सोनू निगम, आदि मान्यवर उपस्थित होते.
आचार्य जियालाल वसंत संगीत निकेतन आयोजित वसंतोत्सव २०२५ या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री ह्रदयनाथ मंगेशकर यांना 'उत्तम वाग्गेयकर पुरस्कार' प्रदान करण्यात आला. उत्तम वाग-ग्याकर पुरस्काराचे पारितोषिक ₹१,११,००० आणि १.२५ किलो वजनाच्या चांदीच्या विटेवर कोरलेले प्रशस्तिपत्र असे आहे. वसंतोत्सव २०२५ वर भाष्य करताना सुरेश वाडकर म्हणाले की
'वसंतोत्सव २०२५' म्हणजे आचार्य जियालाल वसंतजी आणि भारताच्या शास्त्रीय संगीत कलेला वाहिलेली मानवंदना आहे." वसंतोत्सव २०२५ या कार्यक्रमात हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाने भवताल मंत्रमुग्ध झाला. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या सन्मानार्थ उस्ताद झाकीर हुसेन पुरस्कारची घोषणा सुद्धा यावेळी करण्यात आली. उदयोन्मुख गायकांचा सन्मान करण्यासाठी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.