पुरणपोळीच्या शिल्लक पुरणाचं काय करायचं? हे घ्या उत्तर!

    11-Mar-2025
Total Views |

puranpoli

मुंबई : होळी आणि पुरणपोळी या दोन गोष्टींना एकमेकांपासून वेगळे करणे निव्वळ अशक्य. गरमागरमा पुरणपोळीसाठी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळे जण उत्सुक असतात. परंतु पुरणपोळी केल्यानंतरही जर पुरण शिल्लक राहत असेल तर आपण या शिल्लक पुरणापासून सुद्घा एक पदार्थ बनवू शकतो. तो नेमका कसा बनवायचा हेच जाणून घेऊया.

पुरणपोळी खाऊन जर आपल्याला कंटाळा आला असेल, तर शिल्लक पुरणापासून एक रूचकर आणि खमंग पदार्थ आपण तयार करू शकता. सर्वप्रथम शिल्लक राहिलेल्या पुरणाचे छोटे छोटे गोळे करावे. त्यानंतर एका भांड्यात मैदा, कच्चा रवा, आणि चवीप्रमाणे मीठ घालावे, यानंतर हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. यानंतर तेल गरम करून या मिश्रणावर ओतावे. यानंतर घट्ट होईपर्यंत हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. या घट्ट कणिकाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावे. लक्षात असू द्या की हे गोळे पुरणाच्या आकारापेक्षा थोडे मोठे असायला हवे. कणिकाचे हे गोळे लाटून घ्यावे व यामध्ये पुरणाचे गोळे ठेवावेत. कळ्यांच्या आकारात मग हलकेच हे गोळे बंद करावे. या गोळ्यातून पुरण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर हे गोळे मध्यम आचेवर तळून घ्यावेत. दोन्ही बाजूने हे गोळे तळून झाल्यास कुरकुरीत आणि चमचमीत असे पुरणाचे वडे आपण खाऊ शकता.