जाळ्यात गुदमरलेल्या चार कासवांची लाडघर गावकऱ्यांकडून सुटका

11 Mar 2025 21:27:57
entangled sea turtle


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
दापोली तालुक्यातील लाडघरच्या समुद्रात जाळ्यात अडकलेल्या चार समुद्री कासवांना स्थानिक गावकऱ्यांनी मंगळवार दि. ११ मार्च रोजी जीवदान दिले (entangled sea turtle). ग्रामस्थांनी जाळ्यात अडकलेल्या कासवांची सुटका करुन त्यांना पुन्हा समुद्रात सोडले (entangled sea turtle). कोकण किनारपट्टीवर सध्या समुद्री कासवांचा विणीचा हंगाम सुरू असल्याने गावकऱ्यांनी केलेले हे बचाव कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. (entangled sea turtle)


 
मंगळवारी सकाळी लाडघरच्या समुद्रात डाॅल्फिनच्या दर्शनाला गेलेल्या बोटीला जाळ्यात अडकलेली कासवे दिसली. त्यांची संख्या चार होती. वाघर प्रकारच्या जाळ्यात ही कासवे अडकली होती. वाघर प्रकारचे जाळे हे समुद्रात टाकून दिवसभरासाठी ठेवले जाते. या जाळीत सागरी कासवाच्या आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या चार माद्या अडकल्या होत्या. अडकलेल्या कासवांना पाहून लागलीच डाॅल्फिन बोट चालकांनी इतर गावकऱ्यांची मदत मागवली. त्यानंतर या चारही कासवांना जाळे कापून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना एक-एक करुन समुद्रात सोडण्यात आले. सलील मोरे, संदीप मोरे, सानीज शिरधनकर, संजय शेट्ये , प्रवीण शेट्ये, प्रीतम बागकर यांनी ही कामगिरी बजावली बजावली. सध्या कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांचा विणीचा हंगाम असल्यामुळे अंडी घालण्यासाठी मादी कासवे किनाऱ्यावर येत आहे. अशा परिस्थितीत लाडघरच्या ग्रामस्थांनी या चार माद्यांची केलेली सुटका महत्त्वाची ठरली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0