‘किन्नरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार’

    11-Mar-2025
Total Views |

will bring transgenders into the mainstream of society
 
कल्याण : ( will bring transgenders into the mainstream of society ) कल्याण डोंबिवली महापालिका आणि ‘अस्मिता किन्नर संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात किन्नर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. किन्नर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुक्त इंदु राणी जाखड यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात मोठ्या संख्येने किन्नर उपस्थित होते.
 
आयुक्त जाखड यांनी सांगितले की, “समाजातील प्रत्येक घटकाला समान मानवी हक्क मिळाला पाहिजे, तर शासकीय योजनांच्या माध्यमातून किन्नर समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी, आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या डॉ. शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब, ‘किन्नर माँ ट्रस्ट फाऊन्डर’ डॉ. सलमा खान, सोशल अ‍ॅण्ड जेन्डर राईट अ‍ॅड. डॉ. सान्वी जेठवानी, ‘हमसफर ट्रस्ट’चे सीईओ विवेक आनंद, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव, महापालिकेचे स्वच्छता अभियानाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
 
किन्नरांप्रति लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्याची गरज आहे. किन्नर पंथीयांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करावी, असे आवाहन ‘किन्नर अस्मिते’च्या संस्थापक गुरू नीता केणे यांनी केले. “अतिशय प्राचीन कालापासून किन्नरांना उपदेवता म्हणून गौरविण्यात आले आहे. परंतु, आज उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी शिक्षणात आणि अधिकारात एकी दाखविली पाहिजे,” असे मत डॉ. शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब यांनी यावेळी व्यक्त केले.