रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीचा उद्या महिला मेळावा
- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उदघाटक म्हणुन उपस्थित राहणार
11-Mar-2025
Total Views |
मुंबई: ( Republican Party athawale Womens Alliance melava tomorrow ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीचा महिला मेळावा उद्या बुधवार दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता भिमछाया सांस्कृतिक केंद्र, कालीना सांताक्रुझ पूर्व येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
जागतीक महिलादिनानिमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडी तर्फे आयोजित केलेल्या या महिला मेळाव्यास आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे महत्व प्राप्त झाले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या या महत्वपूर्ण महिला मेळाव्याचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा उषाताई रामलु यांनी दिली आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या महिला मेळाव्यास उदघाटक म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले,प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सौ.सिमाताई आठवले,प्रमुख अतिथी म्हणुन शिवसेना प्रवक्त्या शायना एन सी, अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या माजी नगरसेविका फुलाबाई सोनावणे, ऍड.आशाताई लांडगे,चंद्रकांता सोनकांबळे, सौ शिलाताई अनिल गांगुर्डे; ऍड.अभया सोनावणे या मार्गदर्शक म्हणुन उपस्थितीत राहणार आहेत.या महिला मेळाव्यास मुंबईतील रिपब्लिकन कार्यकर्त्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहान उषाताई रामलु यांनी केले आहे.