अर्थसंकल्पात आर्थिकदृष्ट्या सक्षम महाराष्ट्राचे प्रतिबिंब! मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया
11-Mar-2025
Total Views |
मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिकदृष्ट्या सक्षम महाराष्ट्राचे प्रतिबिंब आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, १० मार्च रोजी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. याबद्दल बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे. महायुती सरकारला लोकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. पुढच्या पाच वर्षात राज्याला आर्थिक सक्षम करणे, नवीन आर्थिक स्रोत तयार करणे आणि नवीन महसुली मार्ग तयार करणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे उद्दिष्ट आहे. याचेच प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसले. ज्या क्षेत्राच्या माध्यमातून राज्याचा विकास होऊ शकतो, त्या सगळ्या क्षेत्रांना यात महत्व देण्यात आले आहे."
"मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून हिंदू खाटिक समाज हिंदू समाजाला लागणारे मटण उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून हलाल किंवा भेसळयुक्त मटण बंद होऊन हिंदू समाजाला स्वच्छ आणि आरोग्यदायी मटण उपलब्ध होईल. त्यामुळे प्रत्यकाने या वेबसाईटच्या माध्यमातून मटण खरेदी करावे," असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.