दुर्गम ते सुगम-महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारश्याचे पुनरूत्थान!

10 Mar 2025 17:01:55

ramtek mandir

मुंबई : महाराष्ट्राला अनेक प्राचीन मंदिरांचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा समृद्ध वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक विशेष तरतुदी केल्या असून, महाराष्ट्रातील या सांस्कृतिक वारश्याचे पुनरूत्थान होणार असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५-२६ सालचा अर्थ संकल्प सादर करण्यात आला. यामध्ये “दुर्गम ते सुगम” या कार्यक्रमाअंतर्गत डोंगराळ भागातील प्राचीन मंदिरे, धार्मिक स्थळे, गडकिल्ले व इतर निसर्गरम्य ४५ ठिकाणे रोप-वेव्दारे जोडण्यात येणार आहेत. राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन, संवर्धन व परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महानुभव पंथाच्या श्रध्दास्थानांच्या विकासाची कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

रामटेक येथील मंदिराचे पुनरूत्थान!
प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक येथील श्रीराम मंदिराचे जतन, संवर्धन व परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर महानुभाव पंथांच्या श्रद्धास्थानांच्या विकासाची कामे हाती घेणार असल्याची माहिती सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
 
Powered By Sangraha 9.0