वणव्यामुळे नुकसान झालेल्या धनगरवाडीतील आपादग्रस्ताना शासनाने तात्काळ भरपाई द्यावी

भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांची शासनाकडे विनंती

    10-Mar-2025
Total Views |
 
pravin darekar on Dhangarwadi victims
  
मुंबई- ( pravin darekar on Dhangarwadi victims ) डोंगराला वणवा लागून त्या वणव्याची झळ रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यात असलेल्या इंद्रदेव धनगरवाडीतील घरांना आणि गोठ्यांना बसली. या आगीत घरांचे आणि गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई शासनाने बाधितांना तात्काळ द्यावी, अशी विनंती भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज विधानपरिषदेच्या सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली.
 
सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, इंद्रदेव धनगरवाडी तालुका रोहा, जिल्हा रायगड येथे मौजे धामणसई हद्दीतील गट क्रमांक २२९ क्षेत्र ३८, ८६, ९० हेक्टरमधील धाऊ विठ्ठल कोकळे यांच्या जागेतील इंद्रदेव धनगरवाडी येथे गुरुवार ६ मार्च २०२५ रोजी डोंगरास आकस्मिक वणवा लागून त्याची आग धनगर वाडीपर्यंत पोचली. ३९ घरे व १० गोठ्यांना ही आग लागून नुकसान झालेय. सदर घरांच्या नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झालेत.
 
अंशत घरे २३, पूर्ण घरे १६, अंशत गोठे १०, पूर्णतः गोठे २ यांची अंदाजे रक्कम २७ लाख ७९ हजार ३५० आहे. संबंधित बाधित आपादग्रस्ताना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती असल्याचे दरेकर म्हणाले. दरेकरांच्या या विनंतीवर सभापती राम शिंदे यांनी ही बाब अतिशय गंभीर असून शासनाने तातडीने याची दखल घेण्याची गरज आहे. याबाबतचे संपूर्ण निवेदन आज किंवा उद्या सभागृह संपायच्या आत करावे, अशा सूचना दिल्या.