‘ग्रीन बर्ड्स अभियान’ ‘महाएमटीबी’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे सहभागी होण्याचे आवाहन
10-Mar-2025
Total Views |
पुणे: ( One step towards a good lifestyle by green bird abiyaan ) पुणे येथील ‘ग्रीन बर्ड्स अभियाना’मार्फत पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. अशा उपक्रमांतून समाजात पर्यावरण रक्षणाबाबत जाणीव जागृती निर्माण करणे सहज शक्य होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’देखील यासाठी नेहमीच पुढाकार घेत असते. यावेळी पुण्यात ‘ग्रीन बर्ड्स अभियाना’च्या सहयोगाने माध्यम प्रायोजक म्हणून दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सहभाग असणार आहे.
त्यासाठी आगामी काळात या अभियानाकडून पर्यावरणरक्षणासाठी आयोजित विविध उपक्रमांत एकत्र येऊन काम करणे आणि समाजात पर्यावरणाबाबत समृद्ध जाणिवा निर्माण करणे, हा त्यामागे उद्देश आहे. ‘ग्रीन बर्ड्स अभियाना’चे कार्यकर्ते या कार्यामध्ये नेहमीच पुढाकार घेत असतात. होळी, धूलिवंदन, रंगपंचमी हे सण सर्वत्र रंग खेळून उत्साहात साजरे केले जातात. यावेळी, सामान्य नागरिकांच्या माथी जो कृत्रिम रंग मारला जातो, तो अतिशय घातक आणि आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतो, हे सांगण्याची वेळ आली आहे. नेमके हेच निमित्त साधून यंदा ‘ग्रीन बर्ड्स अभियाना’तर्फे ’विषमुक्त नैसर्गिक रंग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून याचे माध्यम प्रायोजक दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ राहणार आहेत.
या कार्यशाळेतून सहभागी होणार्या लहान मुलांना, पालकांना आणि इतरांना रंग खेळताना कृत्रिम रंगांतून घातक रसायने शरीरात कशी जातात, याची माहिती करून दिली जाणार आहे. तसेच, त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन तज्ज्ञ प्रिया फुलंब्रीकर करणार आहेत. या कार्यशाळेत सणांसाठी आपलेच आपण विषमुक्त रंग कसे तयार करायचे, हे शिकवले जाणार आहे. त्यामुळे विषमुक्त नैसर्गिक रंग तयार करण्याच्या कार्यशाळेत पालकांनी मुलांसह सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होऊन एक पाऊल विषमुक्त जीवनशैलीकडे टाकण्याचे आवाहन ‘ग्रीन बर्ड्स अभियान’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यातर्फे करण्यात आले आहे.
असे व्हा सहभागी
विषमुक्त नैसर्गिक रंग कार्यशाळा, शनिवार, दि. 15 मार्च वेळ : सकाळी 9 ते 11
स्थळ : मधुमालती हॉल, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर-2, पुणे.