हलाल मांसविक्रेत्यांना 'झटका'

- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते "मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम"चे उद्घाटन

    10-Mar-2025
Total Views |

Minister Nitesh Rane inaugurates
 
मुंबई: ( Minister Nitesh Rane inaugurates 'Malhar Certification.com ) 'हलाल'च्या नावाखाली हिंदूविरुद्ध षड्यंत्र रचणाऱ्यांना 'झटका' मिळणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सोमवार, दि. १० मार्च रोजी 'मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम' (https://malharcertification.com) या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. हिंदू रितीनुसार झटका पद्धतीने मांसविक्री करणाऱ्या दुकानांना याद्वारे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
 
 
याविषयी माहिती देताना मंत्री राणे म्हणाले, आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम (https://malharcertification.com) हे संकेतस्थळ आजपासून सुरू करीत आहोत. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकाने उपलब्ध होतील आणि १०० टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल. मांस विकणारी व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ आढळणार नाही.
 
 
 
 
मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा, किंबहुना जेथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल, तेथे मटण खरेदी करू नये असा आवाहन यानिमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित, अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली.
 
गरज काय?
 
हलालसारख्या धार्मिक प्रमाणपत्रामुळे मांस विक्रीचा व्यवसाय हिंदू खाटीकांकडून अन्य धर्मियांकडे जाणीवपूर्वक वळवला जात आहे. परिणामी, राज्यातील बहुसंख्य हिंदू खाटीक वर्गावर बेरोजगारीची टांगती तलवार आली आहे. दुसरे म्हणजे हलाल प्रमाणपत्र देण्याच्या निमित्ताने जे पैसे जमा होतात, ते अतिरेकी कारवायांसाठी, लव्ह जिहादसाठी वापरले जातात, याचे असंख्य पुरावे आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या सरकारने हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांवर बंदी घातली आहे. महाराष्ट्र सरकारनेही अशा प्रकारचे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे.