चंदीगड मध्ये महाराष्ट्राची पदकांची लयलूट..

    10-Mar-2025
Total Views |

Maharashtra medal haul in Chandigarh
 
मुंबई : ( Maharashtra medal haul in Chandigarh )  चंदीगड येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा योगासन क्रीडा स्पर्धा २०२४ - २५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या संघाने घवघवीत यश मिळवत यशाची परंपरा कायम राखली. या योग स्पर्धेत २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे ४०० खेळाडूंनी विविध वयोगटात सहभाग नोंदवला होता..
 
५ सुवर्ण पदक
७ रजत पदक
६ कांस्य पदक
सांघिक द्वितीय क्रमांक अशी कामगिरी महाराष्ट्र संघाने केली त्याबद्दल सर्वत्र कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.