भजन लावले तर गावातून हाकलू

मुस्लीमबहुल रामपूरमध्ये हिंदूंना धमकी; पुजार्‍याला मारहाण

    10-Mar-2025
Total Views |

Hindus threatened in Muslim-majority Rampur 
 
लखनौ: ( Hindus threatened in Muslim-majority Rampur ) रामपूरच्या तांडा पोलीस स्थानक परिसरातील सिकंदराबाद गावातील शिव मंदिरात लाऊडस्पीकरवर भजन वाजवण्यावरून मोठा गोंधळ झाला. गावातील मुस्लिमांनी पुजारी प्रेम सिंह यांना मंदिराबाहेर ओढून बेदम मारहाण केली. तसेच, आरोपींनी जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी भूरी, तौफिक, इक्बाल, छिद्दा, इस्रायल, शैदा, शकील, मुन्सा अली, गुलनाज आणि अनीस यांना अटक केली आहे.
 
पुजारी म्हणतात की, “मुस्लीम लोकांनी गावप्रमुख अफसर अली यांच्या हवाल्याने सांगितले की,गावात आमची सत्ता आहे. जर पुन्हा लाऊडस्पीकर वाजवला गेला, तर आम्ही हिंदूंना गावातून हाकलून लावू. तसेच, जमिनीही जप्त करण्याच्या धमक्याही दिल्या. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तेथे बंदोबस्त तैनात केला आहे.” वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा गोंधळ दि. ७ मार्च रोजी संध्याकाळी झाला.
 
पुजारी प्रेम सिंह नेहमीप्रमाणे मंदिरात आरतीसाठी लाऊडस्पीकरवर भजन वाजवत होते. यावेळी, भूरी, तौफिक, इक्बाल आणि इतर धर्मांधांनी मंदिरात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी भजन थांबवण्यास सांगितले; पण पुजार्‍याने नकार दिल्यावर त्याला शिवीगाळ केली.
 
त्यानंतर इस्रायल, शायदा आणि शकील यांनी त्यांना मंदिराबाहेर ओढले. मंदिराबाहेर छिद्दा, मुन्सा अली आणि अनीस यांनी मिळून त्यांना मारहाण केली. गावकरी आल्यावर सदर लोक पळून गेले. मात्र, निघण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, “जर पुढच्या वेळी भजन वाजवले, तर आम्ही हिंदूंना मारून टाकू.”
 
मुस्लिमांची संख्या अधिक असल्याने प्रसंग
 
पुजारी म्हणाले की, “गावात बहुसंख्य मुस्लीम लोकसंख्या आहे आणि हिंदूंची संख्या कमी असल्याने ते घाबरले आहेत. गावप्रमुख अफसर अलीदेखील आरोपींसोबत होते, ज्यामुळे त्यांचे धाडस वाढले.” रात्री गावकर्‍यांनी पुजार्‍यासह पोलीस स्थानक गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी भूरी, तौफिक, इक्बाल, छिद्दा, इस्रायल, शैदा, शकील, मुन्सा अली, गुलनाज आणि अनीससह १२ जणांना अटक केली.