जेजुरी गडावर वस्त्रसंहिता लागू; भारतीय वेशभूषा अनिवार्य

    10-Mar-2025
Total Views |

Dress Code Policy at Jejuri Devasthan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dress Code Policy at Jejuri)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर मोठ्याप्रमाणात भाविक येत असतात. या भाविकांसाठी सोमवार, दि. १० मार्च पासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. त्यासाठीची नियमावली देखील नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवीन वस्त्रसंहितेनुसार भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल.

हे वाचलंत का? : कल्याणमधील बाल शाखेवर धर्मांधांची दगडफेक

श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल. वेस्टर्न कपडे परिधान करुन आलेल्या भाविकांना खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही. पुरूष अथवा महिला मंदिरात कमी कपड्यांमध्ये आल्यास प्रवेश मिळणार नाही. त्याचबरोबर फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. त्यामुळे असे कपडे न घालण्याचे आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.