सिडकोच्या जमिनी डेब्रिज मुक्त करण्याची मोहीम

भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई

    10-Mar-2025
Total Views |

cidco


नवी मुंबई,दि.१०: प्रतिनिधी सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकाकडून डेब्रीज टाकण्यात येत असून हे डेब्रीज हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रीकी विभाग व पोलीस विभाग यांचेसह दि.१ मार्च रोजी सायंकाळी सिडको कार्यक्षेत्रात मोहिम राबविण्यात आली. सायंकाळी ५:३०वाजण्याच्या सुमारास ही मोहीम राबविण्यात आली.

यामध्ये डंपर चालकासह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.1) पंकज पाल, वय 24 वर्षे, 2) शकील अहमंद सिध्दकी, वय 31 वर्षे, 3) मोहमंद अन्सार, वय 48 वर्षे अशी अटक करण्यात आल्याची नवे आहेत. यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला डंपर एमटीएचएल अटल सेतू कडून उलवेकडे जाणारे लेनवर शिवाजीनगर टोलनाका उलवे, नवी मुंबई येथे आरोग्यास धोकादायक असलेले डेब्रीज/माती सदर डंपरमधून खाली करण्याच्या प्रयत्नात असताना मिळून आला आहे. हे पाहता डंपर चालकाविरुद्ध न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ००२३/२०२५ भारतीय न्याय संहिता(बी.एन.एस) २०२३चे कलम २७१, ६२प्रमाणे दि.०१ मार्च रोजी १०:५० वाजता गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रीज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashrta.gov.in या वेब साईटवर तसेच संबंधीत पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे असे याव्दारे आवाहन सिडकोने केले आहे.