वसईमध्ये उलगडणार बाबुजींचा संगीतमय प्रवास!

01 Mar 2025 09:55:14

babuji

मुंबई : आपल्या स्वरांच्या माध्यमातून संगीत विश्वात माय मराठीची गोडी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सुधीर फडके यांच्या गीतांच्या श्रवणाचा आनंद पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. धुरी परिवार, समाज उन्नति मंडळाचे मनोहर वाचनालय आणि समर्थ मराठा संस्था आयोजित उद्योगश्री शांताराम महादेव धुरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त दि. २ मार्च रोजी 'बाबुजी आणि मी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध संगीतकार श्रीधर सुधीर फडके व वाद्यवृंद मराठी भावगीतं, भक्तीगीते, सिनेगीतांचे अमृततुल्य सादरीकरण करणार आहेत.

सदर कार्यक्रमाला भदंत कीर्तीपीओ नागसेन महाथेरो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. वाय.अेम.सी.अे. सभागृह, क्रिकेट ग्राऊंड, माणिकपूर, वसई पश्चिम येथे हा कार्यक्रम पार पडणार असून, शेखर धुरी, सुरेंद्र वनमाळी, अशोक जाधव यांनी या कार्यक्रमासाठी लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0