संभळ मशिदीची रंगरंगोटी नाहीच अलाहाबाद उच्च न्यायालय

01 Mar 2025 11:39:36

Sambhal Masjid is not colourful: Allahabad High Court 
 
नवी दिल्ली : ( Allahabad High Court on Sambhal jama Masjid )  संभळ येथील जामा मशिदीत रंगकाम करण्याची परवानगी अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी नाकारली असून केवळ साफसफाईची परवानगी दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार, दि. ४ मार्च रोजी होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा’स (एएसआय) संभळमधील जामा मशीद संकुल स्वच्छ करण्याचे निर्देश दिले.
 
उच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, “सध्या संभळ मशिदीला रंगवले जाणार नाही.” आता या प्रकरणाची सुनावणी मंगळवार, दि. ४ मार्च रोजी होणार असून यावेळी मशीद समिती न्यायालयासमोर आपली बाजू मांडणार आहे. दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘एएसआय’ला गुरुवार, दि. ६ मार्च रोजी संभल येथील जामा मशिदीची तत्काळ तपासणी करण्यासाठी तीन अधिकार्‍यांचे एक पथक तयार करण्याचे आणि शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
 
Powered By Sangraha 9.0