मेट्रो ३ ट्रेन कफ परेड स्थानकात दाखल

01 Mar 2025 18:04:48
 
metro 3 at cuffe parade stn
 
मुंबई: ( Metro 3 at Cuffe Parade station ) मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मुंबई मेट्रो ३ने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. क्वा लाईन म्हणून ओळखल्या जाणार्‍या मेट्रो-३च्या ट्रेनने शुक्रवार, दि.२८जी कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामुळे मुंबईकरांसाठी आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.
मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठी समस्या लवकरच सुटणार आहे. दि. २५जुलैपर्यंत संपूर्ण मार्गिका आणि आचार्य अत्रे ते कफ परेड हा मेट्रोमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा दिवस आहे.
 
क्वा लाईनच्या एकूण ३३.५ किमी लांबीच्या मार्गातील १२.६९ किमीचा पहिला टप्पा आरे-जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दि.७ ऑक्टोबर २०२४ पासून प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसर्‍या धारावी ते आचार्य अत्रे चौक या दुसरा टप्पाचा ९.७७ किमीचा भाग वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने जात असून या स्थानकादरम्यान नियमित चाचण्या सुरू आहेत. हा टप्पा सात महत्त्वाच्या स्टेशनला जोडणार आहे. 
 
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या यशस्वी चाचणीमुळे १०.९९ किमी लांबीच्या टप्पा २ बी आचार्य अत्रे चौक ते कफ परेडच्या उभारणीस गती मिळाली आहे. ओव्हरहेड कॅटेनेरी सिस्टम (जउड) आणि ट्रॅक बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, आता उर्वरित प्रणाली म्हणजेच आर्किटेक्चरल फिनिशिंग आणि रस्ते पुनर्बांधणीची कामे प्रगतीपथावर आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0