लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये नुकतीच महाकुंभची सांगता झाली आहे. यानंतर आता काही लोक जातीय हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंच्या घराबाहेर गोवंशी प्राण्यांचे मांस फेकून उन्माद करत आहेत. गोवंशी मांसाचे तुकडे इकडे तिकडे विखुरलेले आढळले आहेत. शहरातील दरियाबाद पोलीस ठाण्याजवळील असणाऱ्या रस्त्यावर आणि नाल्यात एका गोवंशी वासराचे धड पडल्याचे आढळले आहे.
हा सर्व प्रकार पाहून लोकांनी संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. यानंतर आता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी करण्यास सुरूवात केली आणि तपास सुरू केला. आरोपीची ओळख पटण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले. दरियाबादमधील रहिवासी गोपाल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून, अत्रासुईया पोलीस ठाण्याच अज्ञात व्यक्तिंविरूद्ध एफआरआय दाखल केला.
२७ फेब्रुवारी रोजी वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या गोपाल अग्रवाल यांच्या घराच्या गेटवर एका वासराचे कापलेले धड पडले होते. यानंतर, त्यांनी पाहिले की, इतर लोकांच्या घराच्या शेजारी गोवंशांचे विखुरलेले अवयव पडले होते. ही माहिती मिळताच एकच गोंधळ उडाला. या प्रकरणाची माहिती मिळताच तीन पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पशुवैद्यांना बोलावण्यात आले होते. यानंतर एक पथक आले आणि त्यांनी तपास केला आणि गुरांचे अवशेष सोबत नेले. पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय द्विवेदी यांनी सांगितले की, अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला. हे सर्व जाणूनबुजून वातावरण बिघडवण्यासाठी केले आहे. या एफआरआयमध्ये दोन मोठे आरोप करण्यात आले आहे.
एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, हिंदूंच्या घरांवर प्रतिकात्मक फुली मारण्यात आल्या होत्या. त्यानंतर जाणूनबुजून गोवंशी प्राण्यांचे अवशेष ठेवण्यात आले. ज्या भागात ही घटना घडली त्या परिसरात मुस्लिम वस्ती असल्याने मुस्लिम समुदायातील काही अराजकवादी घटकाचे हे कृत्य असू शकते, असे त्यात म्हटले गेले आहे. हा संबंधित परिसर मुस्लिमबहुल भागातील आहे.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, अशा घडलेल्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात आली. मात्र, ज्यांनी असे गैरकृत्य केले आहे त्यांना अद्यापही पोलसांनी ताब्यात घेतले नाही. या प्रकरणावर आता पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी लोकांनी केली. गेल्या पाच महिन्यातील ही तिसरी घटना आहे.