आम आदमी पक्षाच्या कार्यालयाचे भाडे न दिल्याने कार्यालय कुलूपबंद

01 Mar 2025 19:31:51
 
आम आदमी पक्ष
 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 'आप'ला पाणी पाजत कमळ फुलले. त्यामुळे आता आपच्या उतरत्या कळेला प्रारंभ झाला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. अशातच आता मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ शहरातील आम आदमी पक्षाच्या कार्यालयास कुलूप लावण्यात आले आहे. गेली काही महिने वीज बिल भरले नसल्याने आता आप च्या कार्यलयाला कुलूप लावण्यात आले आहे.
 
३ महिन्यांसाठी सुमारे ६० हजार रूपये भाडे जमा करण्यात आले होते. शिवाय गेली ६ महिन्यांपासून विज बील भरलेले नाही. बिलाची एकूण रक्कम ही एकूण १२ ते १३ हजार असल्याचे सांगण्यात येत आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी पक्ष कार्यालयात फोन करण्यात आले. तेव्हा धमक्या देण्यात आल्या होत्या आणि फोनही उचलण्यात आले नव्हते, असे सांगण्यात येत आहे.
 
तसेच कार्यालयाचे मालक विवेक गगलानी म्हणाले की, जेव्हा जेव्हा पक्षाला भाडे आणि वीज बिल भरण्यास सांगितले होते. तेव्हा ते धमकावत असायचे असे विवेक गगलानी म्हणाले. त्यानंतर समझोताबाबतही बोलत होतो, मात्र त्यानंतर नाविलाजाने हे पाऊल उचलावे लागले.
 
पक्षाकडून ठेवीचे पैसे देण्यात आले होते. मात्र. ते माझ्यापर्यंत पोहोचले नाहीत. केवळ २ महिन्यांचे भाडे कष्टावर देण्यात आले. अनेक फोन कॉल्स केले मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे पक्षाशी संबंधितांकडे पैशांची मागणी केली. तेव्हा हे प्रकरण अनावश्यकपणे वाढवले जात असल्याचा दावा पक्षाच्या संबंधितांनी केला.
 
 
Powered By Sangraha 9.0