पश्चिम रेल्वेवर १३ तासांचा पॉवर ब्लॉक

08 Feb 2025 11:31:26

western railway


मुंबई, दि.८ : प्रतिनिधी 
पश्चिम रेल्वेच्या ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान दि. ०८/०९ फेब्रुवारी २०२५ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येईल. ब्रिज क्रमांक ५ च्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण करण्यासाठी शनिवार/रविवार, ०८/०९ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान शनिवार दि. ८ रात्री १०:०० ते रविवार दि. ९ सकाळी ११:०० पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर १३ तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येईल.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत, अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व गाड्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील. यामुळे, ब्लॉक दरम्यान, काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील आणि चर्चगेटहून येणाऱ्या काही गाड्या वांद्रे/दादर स्थानकावर थांबविण्यात येतील किंवा तिथूनच परत जातील.
Powered By Sangraha 9.0