दिल्लीत भाजपचा डंका! २६ वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येणार

08 Feb 2025 11:58:31
 
BJP
 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून तब्बल २६ वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच दिल्लीच्या निवडणूकीचे पुढे येत आहेत.
 
आतापर्यंत पुढे आलेल्या मतमोजणीच्या कलानुसार, दिल्ली विधानसभेत भाजप सर्वाधिक म्हणजेच ४५ जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष २५ जागांच्या पिछाडीवर आहे. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस पारड्यात एकही जागा आलेली नाही. त्यामुळे यंदा दिल्लीतून काँग्रेसचे अस्तित्व संपणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.
 
दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडले. त्यानंतर जवळपास सर्वच एक्झिट पोल्सने भाजपच्या बाजूने कौल दिला होता. आता प्रत्यक्ष मतमोजणीतही हा कल कायम आहे. विविध भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवारी करावी लागली. शिवाय त्यांना मुख्यमंत्री पदही गमवावे लागले होते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे यंदा जनतेने त्यांना नाकारत भाजपला आपला कौल दिला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0